नवी दिल्ली - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. बुधवारी बीसीसीआयने शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश केल्याची घोषणा केली. यानंतर शिखरने सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांचे आभार मानले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ट्विटर अकाऊंटवर शिखरचे सांत्वन केले आहे. यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत शिखर धवनला धीर देत कौतुक केले आहे.
-
Dear @SDhawan25, no doubt the pitch will miss you but I hope you recover at the earliest so that you can once again be back on the field and contribute to more wins for the nation. https://t.co/SNFccgeXAo
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Dear @SDhawan25, no doubt the pitch will miss you but I hope you recover at the earliest so that you can once again be back on the field and contribute to more wins for the nation. https://t.co/SNFccgeXAo
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2019Dear @SDhawan25, no doubt the pitch will miss you but I hope you recover at the earliest so that you can once again be back on the field and contribute to more wins for the nation. https://t.co/SNFccgeXAo
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2019
मोदींनी, इंग्लंडमधील खेळपट्टीलाही तुझी उणीव जाणवेल. तू लवकरच पुन्हा पुनरागमन करशील आणि संघाच्या विजयात हातभार लावशील असा मला विश्वास आहे, अशा आशयाचे ट्विट करत मोदींनी धवनला धीर दिला आहे.
शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू खेळत असताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.