दुबई - इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसनने आयपीएल २०२० च्या समालोचक टीममधून माघार घेतली आहे. तो युएईमधून स्पर्धा अर्ध्यात सोडून मायदेशी इंग्लंडला परतला आहे. ४० वर्षीय पीटरसनने मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी समालोचक टीम सोडली असल्याचे सांगितले आहे.
पीटरसनने याची घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मी आयपीएलमधून माघार घेत आहे. कारण मला माझ्या मुलांसोबत वेळ व्यतीत करावयाचा आहे. २०२० हे वर्ष वेगळेच ठरले आहे, माझी मुलं सद्या कोरोनामुळे शाळेला जात नाहीत. त्यांच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे, असे पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
-
I left the IPL as it’s half term for my kids and I want to be at home with them. It’s been a strange year, so now they’re off school, I want to be with them all day, everyday. 🙏🏽
— Kevin Pietersen🦏 (@KP24) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I left the IPL as it’s half term for my kids and I want to be at home with them. It’s been a strange year, so now they’re off school, I want to be with them all day, everyday. 🙏🏽
— Kevin Pietersen🦏 (@KP24) October 16, 2020I left the IPL as it’s half term for my kids and I want to be at home with them. It’s been a strange year, so now they’re off school, I want to be with them all day, everyday. 🙏🏽
— Kevin Pietersen🦏 (@KP24) October 16, 2020
दरम्यान, पीटरसनने रॉयल चॅलेंजर बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघानी आतापर्यंत चांगला खेळ करत असल्याचे सांगत हे संघ आपले फेवरेट असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात डिव्हिलियर्सला सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीला पाठवण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावर टीका केली.
हेही वाचा - भल्याभल्या फलंदाजांची दांडी 'गुल' करणारा गोलंदाज निवृत्त
हेही वाचा - लोकेश राहुलने राखली 'ऑरेंज' तर, दिल्लीच्या गोलंदाजाकडे 'पर्पल' कॅप