मेलबर्न - कोरोनामुळे जगातील इतर खेळांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धाही अनिश्चित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तुलनेत जास्त प्राधान्य दिले आहे. या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचे आयोजन करेल अशी कमिन्सची तीव्र इच्छा आहे.
कमिन्स आयपीएलमधील सर्वात महागड्या परदेशी खेळाडूंपैकी एक आहे. मागील लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) त्याला 15.50 कोटी बोली लावत संघात घेतले. गेल्या दोन-तीन वर्षांत आम्ही टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोललो आहोत. माझी इच्छा आहे की ही स्पर्धा आयोजित झाली पाहिजे.
कमिन्स हा 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. यावर्षी कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 59 बळी टिपले. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे, ही स्पर्धा 29 मार्चपासून सूरु होणार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही.