ETV Bharat / sports

टी-20 वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळायचंय - कमिन्स - latest news of ipl and cummins

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात महागडा खेळाडू असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या आयोजनाबाबत आशा सोडलेली नाही. कमिन्स म्हणाला, "जेव्हा मी संघाच्या मालकाशी किंवा इतर कोणाशीही बोलतो, तेव्हा ते आत्मविश्वासाने ही स्पर्धा कधी ना कधी होईलच असे सांगतात. मला अनेक कारणांमुळे या स्पर्धेत खेळायचे आहे. आशा आहे की आयपीएल होईल"

pat cummins expected to play ipl before t20 world cup
टी-20 वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळायचंय - कमिन्स
author img

By

Published : May 22, 2020, 12:44 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या नव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सबरोबर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोरोनामुळे घाबरलेल्या जगभरातील लोकांमध्ये सामान्यतेची भावना निर्माण करण्यासाठी प्रेक्षकांशिवाय या आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे कमिन्सने म्हटले होते.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात महागडा खेळाडू असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या आयोजनाबाबत आशा सोडलेली नाही. कमिन्स म्हणाला, "जेव्हा मी संघाच्या मालकाशी किंवा इतर कोणाशीही बोलतो, तेव्हा ते आत्मविश्वासाने ही स्पर्धा कधी ना कधी होईलच असे सांगतात. मला अनेक कारणांमुळे या स्पर्धेत खेळायचे आहे. आशा आहे की आयपीएल होईल"

टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होण्यापूर्वी त्याने आणखी टी-20 सामने खेळण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. कमिन्स म्हणाला, "कोरोनानंतर क्रिकेटच्या पुनरागमनासाठी ही चांगली योग्य गोष्ट ठरेल. यामुळे आपल्या शरीरावर जास्त दबाव राहणार नाही. विश्वकरंडक स्पर्धा कधी ना कधी होईलच. त्यामुळे अधिकाधिक टी-20 क्रिकेट खेळणे खूप चांगले ठरेल."

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. परंतु कोरोनामुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.