ETV Bharat / sports

जे विराट, रोहितला जमले नाही, ते पाकिस्तानच्या शोएब मलिकने करून दाखवले - shoaib malik latest record

शनिवारी पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत मलिकने रावळपिंडीमध्ये खैबर पख्तूनख्वासाठी ७४ धावा करत टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला. यापूर्वी ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे.

Pakistan's shoaib malik went past 10,000 t20 career runs
जे विराट, रोहितला जमले नाही, ते पाकिस्तानच्या शोएब मलिकने करून दाखवले
author img

By

Published : Oct 11, 2020, 5:10 PM IST

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. मलिक टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला आशियाई आणि तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे.

  • Highest run-scorers in all T20 cricket:

    Chris Gayle 👉 13,296
    Kieron Pollard 👉 10,370
    Shoaib Malik 👉 10,027
    Brendon McCullum 👉 9922
    David Warner 👉 9503

    💥 Malik is the newest entrant in the 10,000-run club! pic.twitter.com/EoNEYG8OhL

    — ICC (@ICC) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शनिवारी पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत मलिकने रावळपिंडीमध्ये खैबर पख्तूनख्वासाठी ७४ धावा करत हा टप्पा ओलांडला. मलिकची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएबसाठी एक खास ट्विट केले आहे. "दीर्घायुष्य, संयम, परिश्रम, बलिदान आणि विश्वास शोएब मलिक, मला तुझा अभिमान आहे", असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.

शोएबने या खेळीत ४४ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७४ धावा फटकावल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शोएबने ३५ कसोटी सामन्यांमध्ये १८९८ धावा, २८७ एकदिवसीय सामन्यात ७५३४ धावा आणि ११६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३३५ धावा केल्या आहेत. मलिकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ शतके आणि कसोटीत ३ शतके ठोकली आहेत. २००५मध्ये शोएबने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विराट कोहलीने भारतासाठी सर्वाधिक टी-२० धावा केल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत ९०३३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ८८५३ धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.