नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही पाकिस्तानी खेळाडू श्रीलंकेत अडकले होते. यापैकी काही खेळाडू मंगळवारी घरी पोहोचले आहेत. तर, उर्वरित खेळाडूही लवकर पाकिस्तानला रवाना होतील.
संबंधित खेळाडू कोलंबोमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांशी संपर्कात होते. या खेळाडूंना घरी परतण्यासाठी वाहतुकीची सुविधा देण्यात आली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा थांबवल्या आहेत. त्यामुळे अनेक खेळाडू संधीच्या शोधात देशाबाहेर जातात आणि त्यांच्यासाठी श्रीलंका हे प्रथम स्थान आहे.