ETV Bharat / sports

ICC WC २०१९ : पाकिस्तानी चाहत्याने कर्णधार सर्फराजची तुलना केली 'डुकरा'शी; चाहताच झाला ट्रोल - शोएब मलिक

एका चाहत्याने पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदची तुलना 'डुक्कर'शी केली आहे. सद्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, त्या चाहत्यावरच सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे.

सर्फराज अहमद
author img

By

Published : Jun 22, 2019, 6:10 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा केलेला पराभव पाकिस्तानच्या चाहत्यांना चांगलाच जिव्हारीला लागला आहे. पाकिस्तानी चाहत्यांनी पराभवानंतर खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता तर एका चाहत्याने पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदची तुलना 'डुक्करा'शी केली आहे. सद्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, त्या चाहत्यावरच आता सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद लंडनमधील एका मॉलमध्ये आपल्या मुलासह गेला होता. तेव्हा तिथे एका चाहत्याने व्हिडिओ सुरू करुन सर्फराजची तुलना मोठ्या 'डुकरा'शी केली. यावर सर्फराजने कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या मॉलमधून मुलासह चुपचाप बाहेर पडला.

या आधीही पाकिस्तानी खेळाडूंना चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. एका चाहत्याने तर पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिक याला 'गद्दार' म्हटले होते. या ट्रोलर्सना उत्तर देताना पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिरने एक ट्विट केले. त्यात त्याने खेळाडूंना 'शिवीगाळ' न करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.