ETV Bharat / sports

कोरोना रुग्णांसमोर पाकिस्तानी डॉक्टर्सचा डान्स; गंभीरने शेअर केला व्हिडिओ

author img

By

Published : Apr 13, 2020, 6:53 PM IST

गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पीपीई किट घातलेले डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करून रुग्णांचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. गंभीरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहीले की, 'कोरोना जिथे कुठे आहेस ऐक... चिट्टा चोला...' त्यानं पुढे त्याने 'नया पाकिस्तान' हे हॅशटॅग वापरले आहे.

Pakistani Doctors Break Into Dance In Covid-19 Ward, Gautam Gambhir Shares Video
कोरोना रुग्णांसमोर पाकिस्तानी डॉक्टर्सचा डान्स; गंभीरने शेअर केला व्हिडिओ

मुंबई - भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपचा विद्यमान खासदार गौतम गंभीरने, पाकिस्तानच्या एका रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करत आहेत.

गंभीरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पीपीई किट घातलेले डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करून रुग्णांचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. गंभीरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहीले की, 'कोरोना जिथे कुठे आहेस ऐक... चिट्टा चोला...' त्यानंतर त्याने पुढे 'नया पाकिस्तान' हे हॅशटॅग वापरले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील आहे की नाही, याची अधिकृतरित्या पृष्टी झालेली नाही.

कोरोनामुळे संपूर्ण जगामध्ये भितीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सद्य घडीला जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखाहून अधिक झाली आहे. तर मृताचा आकडा १ लाख १४ हजारावर पोहोचला आहे. तर ४ लाख २३,७०८ जणं कोरोनामुक्त झाली आहेत.

भारतात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे काही राज्यांनी उद्या (१४ एप्रिलला) संपणारा लॉकडाऊन देखील वाढवला आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा ९१५२ वर पोहचला आहे. यामध्ये ७२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी ८५७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात ३०८ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशातील ७९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांना तंदुरुस्त करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या माजी सलामीवीराने सांगितला आयुष्यातील सर्वात खास क्षण

हेही वाचा - कनेरियाचा पीसीबीवर नवा आरोप, पोस्टमध्ये कर्णधारालाही केले 'टॅग'

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.