नवी दिल्ली - लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल समस्यांमुळे ३० ऑक्टोबरपासून सुरू होणारी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे दरम्यानची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आता मुलतानऐवजी रावळपिंडीमध्ये खेळली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही माहिती दिली. पाकिस्तान दौर्यावर झिम्बाब्वेला तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहेत.
-
Pakistan will launch its bid to qualify directly for the @cricketworldcup 2023 by taking on @ZimCricketv in the three ICC Men’s Cricket World Cup Super League matches in Rawalpindi on 30 October, 1 and 3 November.https://t.co/l0OyELLccG pic.twitter.com/w7H9buMkgs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan will launch its bid to qualify directly for the @cricketworldcup 2023 by taking on @ZimCricketv in the three ICC Men’s Cricket World Cup Super League matches in Rawalpindi on 30 October, 1 and 3 November.https://t.co/l0OyELLccG pic.twitter.com/w7H9buMkgs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2020Pakistan will launch its bid to qualify directly for the @cricketworldcup 2023 by taking on @ZimCricketv in the three ICC Men’s Cricket World Cup Super League matches in Rawalpindi on 30 October, 1 and 3 November.https://t.co/l0OyELLccG pic.twitter.com/w7H9buMkgs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2020
गेल्या पाच वर्षांत झिम्बाब्वेचा हा दुसरा पाकिस्तान दौरा असेल. मालिकेच्या मूळ वेळापत्रकानुसार, झिम्बाब्वेचा संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबरला रोजी मुलतान येथे एकदिवसीय मालिका खेळणार होता. ही मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. त्यानंतर उभय संघांत ७, ८ आणि १० नोव्हेंबरला रावळपिंडीमध्ये टी-२० सामने खेळले जाणार आहेत. आता हे सामने लाहोरमध्ये हलवण्यात आले आहेत.