शारजाह - भारताविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका आपल्या नावावर केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानविरुद्धही दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कांगारूंनी ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया ५ एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
Australia win by eight wickets!
— ICC (@ICC) March 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Fine knocks from Aaron Finch and Shaun Marsh take them home with an over to spare.#PAKvAUS | FOLLOW ⬇️https://t.co/XAVa5hlegO pic.twitter.com/7EerWAFz41
">Australia win by eight wickets!
— ICC (@ICC) March 22, 2019
Fine knocks from Aaron Finch and Shaun Marsh take them home with an over to spare.#PAKvAUS | FOLLOW ⬇️https://t.co/XAVa5hlegO pic.twitter.com/7EerWAFz41Australia win by eight wickets!
— ICC (@ICC) March 22, 2019
Fine knocks from Aaron Finch and Shaun Marsh take them home with an over to spare.#PAKvAUS | FOLLOW ⬇️https://t.co/XAVa5hlegO pic.twitter.com/7EerWAFz41
शारजाह क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाक कर्णधार शोएब मलिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हॅरीस सोहीलने केलेल्या १०१ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारीत २० षटकांमध्ये पाकिस्तानच्या संघाने ५ गडी गमावत २८० धावा केल्या. हॅरीससह शान मसुदने ४० तर उमर अकमल ४८ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर-नाईलने २ तर झाय रिचर्डसन, नाथन लायन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
पाकने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत २ गड्यांच्या मोबदल्यात ४९ व्या षटकात विजय मिळवला. कांगारू कर्णधार अॅरोन फिंचने ११६ धावांची शतकी खेळी साकारली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शॉन मार्शने नाबाद ९१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या फिंचला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.