लंडन - ऐतिहासिक क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पाकचे 20 खेळाडू आणि क्रीडा कर्मचारी इंग्लंडला उतरले. इंग्लंड दौर्यावर पाकिस्तानला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.
पाकिस्तानचा हा गट लाहोरहून चार्टर्ड विमानाने मँचेस्टरला पोहोचला. यानंतर त्यांना तेथून वॉर्कयाशर येथे नेण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या अधिकृत ट्विटरवर या गटाच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, मास्क घातलेले खेळाडू आणि क्रीडा कर्मचारी दिसून आले आहेत.
-
Pakistan team arrival Manchester 🏴#ENGvPAK pic.twitter.com/FWWPtgUjEs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistan team arrival Manchester 🏴#ENGvPAK pic.twitter.com/FWWPtgUjEs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 28, 2020Pakistan team arrival Manchester 🏴#ENGvPAK pic.twitter.com/FWWPtgUjEs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 28, 2020
कसोटी संघाचे नेतृत्व अझर अलीकडे देण्यात आले आहे. तर, बाबर आझम संघाचा उप-कर्णधार असेल. ईसीबीने म्हटले आहे, की पाकिस्तान संघ 14 दिवसांच्या क्वारंटाईननंतर डर्बीशायरला जाईल आणि 13 जुलैला इनकोरा काऊंटी मैदानावर तयारी सुरू करेल. येथे हा संघ दोन सराव सामने खेळणार आहे. दौरा सुरू करण्यापूर्वी, सर्व लोकांची प्रवासापूर्वी चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
पाकिस्तान संघ - अझर अली (कर्णधार), बाबर आजम, आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इप्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम उल हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शेनवारी आणि यासिर शाह.