कराची - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. शनिवारी नॅशनल कप टी-२० स्पर्धेच्या सामन्यानंतर गुल निवृत्त झाला. गुल पुढील कारकीर्द प्रशिक्षणात घालवण्यासाठी इच्छुक आहे. गुलने पाकिस्तानकडून ४७ कसोटी, १३० एकदिवसीय तर ६० टी-२० सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने २००९मध्ये टी-२० विश्वकरंडक जिंकला होता. पाकच्या या विजयात गुलने मोलाचे योगदान होते.
-
Emotional scenes at the #NationalT20Cup as a 20-year-career comes to a close.
— ICC (@ICC) October 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Umar Gul, star of Pakistan's win in the 2009 @t20worldcup, retired from all cricket with 987 wickets against his name 🌟 pic.twitter.com/46KZ2eo1BR
">Emotional scenes at the #NationalT20Cup as a 20-year-career comes to a close.
— ICC (@ICC) October 17, 2020
Umar Gul, star of Pakistan's win in the 2009 @t20worldcup, retired from all cricket with 987 wickets against his name 🌟 pic.twitter.com/46KZ2eo1BREmotional scenes at the #NationalT20Cup as a 20-year-career comes to a close.
— ICC (@ICC) October 17, 2020
Umar Gul, star of Pakistan's win in the 2009 @t20worldcup, retired from all cricket with 987 wickets against his name 🌟 pic.twitter.com/46KZ2eo1BR
शुक्रवारी रावळपिंडी येथे दक्षिण पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर गुलचा संघ उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला. ''जड अत: करणाने नॅशनल कप टी-२० स्पर्धेनंतर मी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमधून निवृत्तीचा विचार केला आहे. मी नेहमीच पाकिस्तानकडून जोशाने खेळलो आहे. क्रिकेट हे नेहमीच माझे पहिले प्रेम असेल, परंतू सर्व चांगल्या गोष्टींना अंत असतो.''
उमर गुलने २००३ ते २०१६ या काळात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. गुलने कसोटीत १६३, एकदिवसीयमध्ये १७९ तर टी-२० मध्ये ८५ गडी बाद केले आहेत. याशिवाय गुल आयपीएलमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. उमर गुलने कसोटीचा शेवटचा सामना २०१३मध्ये खेळला होता. याशिवाय तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अखेरचा सामना २०१६ मध्ये खेळला. गुलने क्रिकेटच्या तिनही प्रकारात ४००हून अधिक गडी बाद केले आहेत.