कराची - आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने संभाव्य 23 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादित पाक क्रिकेट बोर्डाने अनुभवी खेळाडू वहाब रियाज, उमर अकमल आणि अहमद शहजाद यांना स्थान दिलेले नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) मिळालेल्या अधिकृत माहितीनूसार निवडलेल्या संभावित खेळाडूंना 15 आणि 16 एप्रिलला लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस टेस्ट देण आवश्यक आहे. यानंतर 18 एप्रिलला अंतिम संघ घोषित केला जाणार आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात ३० मे ला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या सामन्यापासून होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉर्डसवर खेळण्यात येणार आहे.
विश्वचषकासाठी 23 संभाव्य खेळाडू असलेला पाकिस्तानचा संघ
सर्फराज अहमद (कर्णधार), अबीद अली, आसीफ अली, बाबर आझम, फहीम अश्रफ, फाखर झमान, हॅरीस सोहेल, हसन अली, इमाद वासीम, इमाम-उल-हक, जुनैद खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद आमीर, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हस्नेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, शोएब मलिक, उस्मान शिनवारी, यासीर शाह.