लाहोर - पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच चर्चेत असतो. आता तो आणखी एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर हिट ठरला आहे. शोएबला यूट्यूब चॅनेलकडून 'गोल्डन प्ले बटन' मिळाले आहे.
शोएब अख्तर याचे यूट्यूबवर 'मीडिया टॉप' नावाचे एक चॅनेल आहे. या चॅनेलला 10 लाख म्हणजेच 1 मिलियन सबस्क्राइबर्स मिळाले आहेत. त्यामुळे शोएबला हा सन्मान मिळाला आहे. एका महिन्याच्या कालावधीतच या चॅनेलने 1 मिलियन सबस्क्राइबर्सचा आकडा गाठला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या गोल्डन बटनसह शोएबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटोसह व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत शोएबने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, 'इथेपर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्वांचे आभार'.
शोएब आपल्या चॅनेलवरुन नेहमी मते मांडत असतो. याआधी आपल्याच संघकाऱ्यांबद्दल विधाने केल्यामुळे तो चर्चेत राहिला आहे. विश्वकरंडक स्पर्धेत त्याने पाक कर्णधार सर्फराज अहमदला बिनडोक कर्णधार म्हटले होते.