ETV Bharat / sports

सचिन जेवढा महान फलंदाज तेवढाच 'खतरनाक' गोलंदाज, पण....

आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून इंझमामने सचिनचे कौतुक केले. 'सचिन तेंडुलकर एक महान गोलंदाजही होता. मला कुणाचीही गुगली वाचण्यात कधीच अडचण आली नाही. पण सचिनने मला बर्‍याचदा बाद केले आहे', असे इंझमामने म्हटले आहे.

author img

By

Published : Feb 26, 2020, 6:13 PM IST

pakistan former captain inzamam ul haq praises sachin tendulkar
सचिन जेवढा महान फलंदाज तेवढाच 'खतरनाक' गोलंदाज, पण....

कराची - पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. भारतीय क्रिकेटपटूंविषयीच्या वक्तव्यामुळे पाकचे अनेक खेळाडू याआधी सोशल मीडियावर 'ट्रेंडिंग' पाहायला मिळाले आहेत. आता पाकिस्तान क्रिकेटचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनेही भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी आपले मत दिले आहे. 'सचिन जेवढा महान फलंदाज होता तेवढाच तो 'खतरनाक' गोलंदाजही होता', असे इंझमामने म्हटले आहे.

हेही वाचा - विराटपेक्षा स्मिथ 'भारी', वाचा आयसीसीची नवी क्रमवारी

आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून इंझमामने सचिनचे कौतुक केले. 'सचिन तेंडुलकर एक महान गोलंदाजही होता. मी जगातील सर्व लेगस्पिनर्संना खेळलो. मला कुणाचीही गुगली वाचण्यात कधीच अडचण आली नाही. एक सचिन होता जो गुगली करायचा, मग मी अस्वस्थ व्हायचो. याच कारणास्तव त्याने मला बर्‍याचदा बाद केले आहे', असे इंझमाम म्हणाला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'सचिन त्या काळात खेळला जेव्हा कोणताही महान फलंदाज ८ हजारांपेक्षा जास्त धावा करू शकला नाही. अपवाद म्हणून तुम्ही सुनील गावस्कर यांचे नाव घेऊ शकता. त्यांनी १० हजार धावा केल्या. पण, सचिनकडे बघा. त्याने ३५ हजार धावा केल्या. आता त्याचा विक्रम कोण मोडतो हे पाहिले जाईल', असेही इंझमामने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

सचिनबद्दल तक्रार -

इंझमामने या व्हिडिओच्या शेवटी सचिनबद्दल एक तक्रार केली आहे. 'सचिनकडे जी क्षमता आणि प्रतिभा होती, ती त्याने लोकांमध्ये वाटली नाही. आपला अनुभव सचिनने युवा खेळाडूंसोबत शेअर केला नाही. मला वाटते सचिनने याबद्दल विचार केला पाहिजे', असे इंझमामने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.