कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला ४७व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्याने सचिनला ‘क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज’ म्हटले. क्रिकेटच्या मैदानावर सचिन विरूद्ध अख्तर यांच्यातील सामना नेहमी चर्चेचा विषय ठरत होता.
‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने सचिनविरुद्ध मैदानातील लढाई हा त्याच्या खेळण्याच्या दिवसांचा खजिना असल्याचेही म्हटले आहे. त्याने ट्विटरद्वारे या शुभेच्छा दिल्या. वाचा अख्तरने केलेले ट्विट -
-
A very happy birthday to @sachin_rt . Arguably the best batsman in the history of the game. Its a pleasure to have known you, playing with you & against you.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The battles against you on the ground are a treasure of my playing days. #HappyBirthdaySachin #SachinTendulkar pic.twitter.com/oJSN9vWCHd
">A very happy birthday to @sachin_rt . Arguably the best batsman in the history of the game. Its a pleasure to have known you, playing with you & against you.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 24, 2020
The battles against you on the ground are a treasure of my playing days. #HappyBirthdaySachin #SachinTendulkar pic.twitter.com/oJSN9vWCHdA very happy birthday to @sachin_rt . Arguably the best batsman in the history of the game. Its a pleasure to have known you, playing with you & against you.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 24, 2020
The battles against you on the ground are a treasure of my playing days. #HappyBirthdaySachin #SachinTendulkar pic.twitter.com/oJSN9vWCHd
सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध १९८९साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी १९९४ साली सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. १९९४साली श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिनने ११० धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार २ षटकार लगावले. १६ नोव्हेंबर २०१३ म्हणजे २४ वर्षांनी सचिनने क्रिकेटला बाय बाय केले. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.