ETV Bharat / sports

पाक खेळाडूंना ३ महिने घरापासून लांब रहावे लागणार!

गद्दाफी स्टेडियममध्ये सराव सत्रासाठी राहण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंनी इंग्लड दौऱ्यातून स्वत:हून माघार घ्यावी, असे पाक बोर्डाने म्हटले आहे.

Pakistan cricketers
पाक खेळाडूंना ३ महिने घरापासून लांब रहाव लागणार, जाणून घ्या कारण...
author img

By

Published : May 21, 2020, 2:43 PM IST

लाहोर - पाकिस्तान क्रिकेटचा संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाक क्रिकेट बोर्डाने आतापासून तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बोर्डाने दौऱ्याला जाणाऱ्या सर्व खेळाडूंना सरावासाठी गद्दाफी स्टेडियममध्ये ठेवण्याचे ठरवले आहे. सराव सत्रासाठी स्टेडियममध्ये राहण्यास नकार देणाऱ्या खेळाडूंनी दौऱ्यातून स्वत:हून माघार घ्यावी, असे बोर्डाने म्हटले आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना गद्दाफी स्टेडियममध्ये राहण्यास सांगितले आहे. या स्टेडियमच्या परिसरात नॅशनल क्रिकेट अकॅडमी आहे. यात अकॅडमीत सराव सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या अकॅडमीमध्ये खेळाडू काही दिवस सराव करून इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. गद्दाफी स्टेडियममध्ये खेळाडूंची राहण्याची खाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या धोक्यामुळे त्यांची योग्य ती काळजीही येथे घेण्यात येणार आहे.

याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी सांगितले की, 'इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना तीन महिने सुरक्षित वातावरण ठेवण्यात येईल. जर कोणत्या खेळाडूला यात सहभागी व्हायचे नसेल तर त्याने या दौऱ्यातून स्वत:हून माघारी घ्यावी. हाच एक पर्याय आहे. याबद्दल अधिक माहिती लवकरच दिली जाईल.'

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

हेही वाचा - बीसीसीआय 'या' महिन्यांत आयपीएलचे आयोजन करण्याच्या तयारीत?

हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये आयपीएल शक्य, बीसीसीआय कार्यकारिणी सदस्यांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.