ETV Bharat / sports

Australia Tour : कर्णधारपदानंतर सरफराजची संघातूनही हकालपट्टी - कर्णधारपदानंतर सरफराजची संघातून हकालपट्टी

कसोटी संघात पीसीबीने मुसा खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि आणि १६-वर्षीय नसीम शाह या ३ नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.  या मालिकेत सरफराजसह गोलंदाज हसन अली यालाही वगळण्यात आले आहे. दरम्यान, हसनला पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेतून ३७ वर्षीय मोहम्मद इरफान २०१३ नंतर पुनरागमन करणार आहे. या संघाचे नेतृत्व अझर अलीकडे देण्यात आले आहे.

कर्णधारपदानंतर सरफराजची संघातूनही हकालपट्टी
author img

By

Published : Oct 22, 2019, 2:14 PM IST

कराची - आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. या संघात माजी कर्णधार सरफराज अहमदला दोनही संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, सरफराजला काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. आता संघातूनही वगळण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून या मालिकेत पाकिस्तानचा संघ ३ टी-२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होणार आहे.

कसोटी संघात पीसीबीने मुसा खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि आणि १६-वर्षीय नसीम शाह या ३ नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेत सरफराजसह गोलंदाज हसन अली यालाही वगळण्यात आले आहे. दरम्यान, हसनला पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेतून ३७ वर्षीय मोहम्मद इरफान २०१३ नंतर पुनरागमन करणार आहे. या संघाचे नेतृत्व अझर अलीकडे देण्यात आले आहे.

टी-२० संघाची धुरा बाबर आझमकडे सोपविण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान आणि मूसा खान यांना टी-२० संघात संधी देण्यात आली आहे. तर, श्रीलंकाविरुद्ध टी-२० मालिका खराब कामगिरी करणाऱ्या उमर अकमल आणि अहमद शहजाद यांना बाहेरचा मार्ग दाखविण्यात आला आहे.

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानचा टी-२० संघ -
    बाबर आझम (कर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हॅरिस सोहेल, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम-उल-हक, शादाब खान, मुसा खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), वहाब रियाज, खुशदिल खान आणि उस्मान कादिर.

हेही वाचा - आशिया करंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना 'या' दिवशी

  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तानचा कसोटी संघ -
    अझहर अली (कर्णधार), अबिद अली, बाबर आझम, हॅरिस सोहेल, असद शफिक, इमाम-उल हक, इमरान खान, इफ्तिखार अहमद, काशिफ भट्टी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान, मुसा खान, नसीम खान, शाहीन आफ्रिदी, शान मसूद आणि यासिर शाह.

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.