नवी दिल्ली - टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या कालावधीमध्ये टीम इंडियावर अतिरेक्यांचा हल्ला होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिली आहे.
मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, पीसीबीला या हल्लाच्या धमकीचा ई-मेल मिळाला आहे. या मेलमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियावर अतिरेक्यांचा हल्ला होऊ शकतो, असे म्हटले आहे. हा मेल पीसीबीने आयसीसीला आणि बीसीसीआयला पाठवला आहे.
-
Big news by @sohailimrangeo; PCB received an email about possibility of an attack on Indian team in West Indies. The PCB, acting responsibly, has passed the information to the International Cricket Council. pic.twitter.com/2y5Es3JWpL
— Faizan Lakhani (@faizanlakhani) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Big news by @sohailimrangeo; PCB received an email about possibility of an attack on Indian team in West Indies. The PCB, acting responsibly, has passed the information to the International Cricket Council. pic.twitter.com/2y5Es3JWpL
— Faizan Lakhani (@faizanlakhani) August 18, 2019Big news by @sohailimrangeo; PCB received an email about possibility of an attack on Indian team in West Indies. The PCB, acting responsibly, has passed the information to the International Cricket Council. pic.twitter.com/2y5Es3JWpL
— Faizan Lakhani (@faizanlakhani) August 18, 2019
आयसीसीने आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मात्र या मेलला अफवा मानले आहे. बीसीसीआयनेदेखील या मेलचे खंडण केले आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, भारतीय संघावर कोणतेही संकट नाही.
टीम इंडिया ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारताने टी-२० मालिका खिशात घातली आहे. येत्या २२ ऑगस्टपासून टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार आहे.