लाहोर - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसीम खान यांनी भारतासोबत क्रिकेट खेळण्याविषयी मत दिले आहे. ''पाकिस्तान क्रिकेटच्या चाहत्यांना माझा संदेश आहे, की आम्ही आतापर्यंत बरेच काही साध्य केले आहे आणि त्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. परंतू पाकिस्तानला भारताबरोबर एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी चिंता करण्याची गरज नाही. कारण या गोष्टीशिवाय आमच्याकडे अजून खूप काम आहे", असे वसीम खान यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात वसीम खान यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "बीसीसीआयने पाकिस्तानबरोबर खेळण्यापूर्वी भारत सरकारची मान्यता आवश्यक आहे आणि हे सत्य आहे. म्हणूनच या क्षणी जे सत्तेत आहेत, त्यांची जीवनशैली, काही बाबींवरील त्यांचे मत, ज्यामध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात भारताबरोबर खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. "
खान म्हणाले, "आम्ही फक्त पीटीव्ही आणि ऑपरेटर्सशी करार केला आहे. जेणेकरून पुढील तीन वर्षांत आपण २०० मिलियन डॉलर्स कमवू शकू. एक बोर्ड म्हणून आम्ही आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. आम्ही भारताबरोबर आयसीसी स्पर्धांमध्ये खेळत राहू, परंतू द्विपक्षीय मालिका होईल, असे मला वाटत नाही.''