कराची - फलंदाज बाबर आझमचे शतक आणि उस्मान शिनवारीच्या पाच बळींच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केली. दहा वर्षानंतर खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने लंकेला ६७ धावांनी हरवले.
-
Pakistan win the second #PAKvSL ODI by 67 runs!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
SCORECARD ➡️ https://t.co/IkI8O1b51s pic.twitter.com/y1CEfrnNMY
">Pakistan win the second #PAKvSL ODI by 67 runs!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 30, 2019
SCORECARD ➡️ https://t.co/IkI8O1b51s pic.twitter.com/y1CEfrnNMYPakistan win the second #PAKvSL ODI by 67 runs!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 30, 2019
SCORECARD ➡️ https://t.co/IkI8O1b51s pic.twitter.com/y1CEfrnNMY
हेही वाचा -इम्रान खान दहशतवाद्यांचे 'रोल मॉडेल,' गौतम गंभीर यांचा हल्लाबोल
नाणेफेक जिंकलेल्या पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात ३०५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २३८ धावा करू शकला. त्यांनी सुरुवातीला २८ धावांत ५ गडी गमावले. त्यानंतर, आलेल्या शेहान जयसूर्याने ९६ धावांची दमदार खेळी केली. जयसूर्या आणि दासुन शनाका यांनी १७७ धावांची भागिदारी रचली खरी पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. शनाकाने ८० चेंडूत ६८ धावा केल्या. पाकिस्तानकडून उस्मान शिनवारीने गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन करत पाच खेळाडूंना माघारी धाडले. यासाठी त्याने ५१ धावा मोजल्या.
-
The seventh bowler to take an ODI five-wicket haul at the National Stadium Karachi. @Usmanshinwari6 doing the honours of his induction on the NSK Honours Board.#PAKvSL pic.twitter.com/0AvjOB0Ybg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The seventh bowler to take an ODI five-wicket haul at the National Stadium Karachi. @Usmanshinwari6 doing the honours of his induction on the NSK Honours Board.#PAKvSL pic.twitter.com/0AvjOB0Ybg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 1, 2019The seventh bowler to take an ODI five-wicket haul at the National Stadium Karachi. @Usmanshinwari6 doing the honours of his induction on the NSK Honours Board.#PAKvSL pic.twitter.com/0AvjOB0Ybg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 1, 2019
तत्पूर्वी, पाकिस्तानकडून बाबर आझमने शतक झळकावले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकारांसह ११५ धावा केल्या. शिवाय, यंदाच्या हंगामात त्याने १००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सलामीवीर फखर झमानने ५४ तर, हॅरिस सोहेलने ४० धावांचे योगदान दिले. लंकेकडून लेग स्पिनर वाहिंदु इसरांगाने ६३ धावांमध्ये दोन बळी मिळवले.