ETV Bharat / sports

पाकचा रझाक म्हणतो, 'बुमराह 'बच्चा', त्यांची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती'

author img

By

Published : Dec 4, 2019, 6:02 PM IST

अब्दुल रझाकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी ग्लेन मॅकग्राथ, वसिम अक्रम आणि शोएब अख्तर सारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे मला जर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागला असता तर ते माझ्यासाठी कठीण वाटत नाही.

Pakistan Allrounder Abdul Razzaq Says Jasprit Bumrah is a Baby Bowler
पाकचा रझाक म्हणतो, 'बुमराह 'बच्चा', त्यांची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती'

कराची - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकच्या मते, तो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी सहज फोडून काढू शकतो. बुमराह अजून 'बच्चा' आहे पण, त्याचे चेंडूला सीम करण्याचे कौशल्य भन्नाट असल्याचे, रझाकचे मत आहे.

अब्दुल रझाकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की 'मी ग्लेन मॅकग्रा, वसिम अक्रम आणि शोएब अख्तर सारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे. त्यामुळे मला जर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागला असता तर ते माझ्यासाठी कठीण वाटत नाही. मी त्याची गोलंदाजी सहज फोडून काढली असती.'

या मुलाखती दरम्यान, त्याने विराटची स्तुती करताना सांगितले की, 'विराट एक यशस्वी फलंदाज आहे. तो वेगाने धावा जमवतो. पण, त्यांची सचिनशी तुलना करणे शक्य नाही. दोघांची फलंदाजी वेगळी आहे.'

रझाक खराब फॉर्ममुळे मागील काही काळापासून पाकिस्तान संघातून बाहेर आहे. मात्र, अद्याप त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही.

हेही वाचा - विंडीजची नवी खेळी..भारताला रोखण्यासाठी संघासाठी नेमला भारतीय प्रशिक्षक!

हेही वाचा - स्मिथला पछाडत किंग कोहली पहिल्या स्थानी विराजमान

हेही वाचा - पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा..! रोहितचा केदारला मजेशीर सल्ला

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.