ETV Bharat / sports

PAK vs BAN : पाकच्या नसीम शहाचा विश्वविक्रम, कसोटीत हॅट्ट्रिक घेत रचला 'हा' इतिहास

author img

By

Published : Feb 9, 2020, 7:15 PM IST

नसीमने कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक साधली. याआधी सर्वात कमी वयात हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम बांगलादेशचा फिरकीपटू आलोक कपाली याच्या नावे होता. त्याने वयाच्या १९ वर्षी २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हा विक्रम नोंदवला होता. त्याचा हा विक्रम नसीमने मोडत नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.

pak vs ban 1st test naseem shah becomes youngest cricketer to claim test hat-trick
PAK vs BAN : पाकच्या नसीम शहाचा विश्वविक्रम, कसोटीत हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास

रावळपिंडी - पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शहाने कसोटीत हॅट्ट्रिक विकेट घेत विश्वविक्रम आपल्या नावे केला. त्याने रावळपिंडीच्या मैदानात बांगलादेशविरुद्ध खेळताना ही किमया साधली. १६ वर्षीय नसीम कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक नोंदवणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.

नसीमने कारकिर्दीतील चौथ्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक साधली. याआधी सर्वात कमी वयात हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम बांगलादेशचा फिरकीपटू आलोक कपाली याच्या नावे होता. त्याने वयाच्या १९ वर्षी २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हा विक्रम नोंदवला होता. त्याचा हा विक्रम नसीमने मोडत नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.

pak vs ban 1st test naseem shah becomes youngest cricketer to claim test hat-trick
नसीम शहा बाबर आझमसोबत....

नसीमने बांगलादेशच्या दुसऱ्या डावातील ४१ व्या षटकात नजीमुल हुसेन, तैजुल इस्लाम आणि मेहमद्दुलाला माघारी धाडत हॅट्ट्रिक घेतली. दरम्यान पाकिस्तानने या सामन्यावर पकड मिळवली आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. त्यानंतर पाकिस्तानने बाबर आझम आणि शान मसुदच्या शतकी खेळाच्या जोरावर ४४५ धावांपर्यंत मजल मारत सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात बांगलादेशने तिसऱ्या दिवसाअखेर ६ बाद १२६ धावा केल्या आहेत. बांगलादेशचा संघ ८६ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे अवघ्या ४ विकेट शिल्लक आहेत. यामुळे बांगलादेशला डावाने पराभव टाळण्यासाठी चौथ्या दिवशी संघर्ष करावा लागणार आहे.

हेही वाचा - विराट सेना न्यूझीलंडमधून करतेय युवा संघाला 'चिअरअप', फोटो व्हायरल

हेही वाचा - संथगतीचा भारताप्रमाणे न्यूझीलंडलाही फटका; खेळाडूंच्या ६० टक्के मानधनावर कात्री

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.