मुंबई - आजपासून बरोबर 30 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी, एकाच कसोटी सामन्यात दोन युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि त्यानंतरच्या काळात या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली सत्ता गाजवली. या खेळाडूंपैकी एक म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार यूनुस.
-
#OnThisDay in 1989, Sachin Tendulkar and Waqar Younis made their international debuts as teenagers.
— ICC (@ICC) November 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The rest, as they say, is history 🙌 pic.twitter.com/o419M8n0cA
">#OnThisDay in 1989, Sachin Tendulkar and Waqar Younis made their international debuts as teenagers.
— ICC (@ICC) November 15, 2019
The rest, as they say, is history 🙌 pic.twitter.com/o419M8n0cA#OnThisDay in 1989, Sachin Tendulkar and Waqar Younis made their international debuts as teenagers.
— ICC (@ICC) November 15, 2019
The rest, as they say, is history 🙌 pic.twitter.com/o419M8n0cA
हेही वाचा - १४ वर्षाच्या ईशा सिंगचा पराक्रम, आशियाई नेमबाजी स्पर्धेत जिंकली ३ सुवर्णपदके
1989 मध्ये कराची येथे भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आणि वकार युनूसने पदार्पण केले होते. अत्यंत रोमहर्षक झालेली ही कसोटी अनिर्णित राहिली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इम्रान खानच्या शतकी खेळीच्या जोरावर 409 धावांची नोंद केली होती. प्रत्युत्तरादाखल भारत 262 धावांवर सर्वबाद झाला. वकारने पहिल्या डावात सचिनला 15 धावांवर बाद केले होते.
दुसर्या डावात, सामना जिंकण्याच्या आशेने पाकिस्तानने 3 बाद 305 धावांवर डाव घोषित केला. ही कसोटी पाकिस्तान लवकरच खिशात घालणार असे वाटत असताना फलंदाज संजय मांजरेकर संघासाठी धावून आला. त्याने मधल्या फळीत चांगली कामगिरी करत नाबाद 113 धावा केल्या. नवज्योत सिद्धूनेही 85 धावांचे योगदान दिले.
या सामन्यात तेंडुलकर आणि वकारखेरीज आणखी दोन नवख्या खेळाडूंनीही पदार्पण केले होते. हे खेळाडू होते पाकिस्तानचा फलंदाज शाहीद सईद आणि भारताचा वेगवान गोलंदाज सलील अंकोला.
16 नोव्हेंबर 2013 म्हणजे 24 वर्षांनी सचिनने क्रिकेटला बाय बाय केले. सचिनने 200 कसोटी सामन्यात 15921 धावा आणि 463 एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. तर, 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या वकारने 87 कसोटी सामन्यात 3373 बळी घेतले तर 416 एकदिवसीय मध्ये 262 बळी घेतले आहेत.