मुंबई - आगामी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दोन संघ जाहीर केले आहेत. यामध्ये मनिष पांडे आणि श्रेयश अय्यर यांच्याकडे अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. दरम्यान ही मालिका २९ ऑगस्टपासून सुरू होणार असून, मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांसाठी पांडे, आणि उर्वरित २ सामन्यांसाठी अय्यर संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
महत्वाचे म्हणजे, या मालिकेतून आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत दुखापत झालेला अष्टपैलू खेळाडू विजय शंकर पुनरागमन करणार आहे. ही मालिका तिरुअनंतपुरम येथे होणार असून २९ आणि ३१ ऑगस्ट, २, ४ व ८ सप्टेंबर या दिवसी सामने होतील. या सामन्यांवर निवड समितीची नजर असणार आहे. यामुळे भारतीय मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना ही चांगली संधी आहे.
पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ -
मनिष पांडे (कर्णधार), शुबमन गिल, विजय शंकर, रुतूराज गायकवाड, नितीश राणा, रिकी भुई, अनमोलप्रीत सिंग, इशान किशन (यष्टिरक्षक) , शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, दीपक चहर, खलील अहमद.
शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, इशार पोरेल.