माउंट माउंगानुई - न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याचा मालिकेत ३-० ने निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत भारताची आघाडीची फळी तिन्ही सामन्यात अपयशी ठरली. तेव्हा मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी भारताची लाज राखली. श्रेयस संपूर्ण मालिकेत भारताचा तारणहार ठरला. त्याने या मालिकेत अनेक विक्रमाची नोंद केली. वाचा श्रेयसने केलेले विक्रम...
- श्रेयसने तिन्ही सामन्यात ५० हून अधिक धावा करत महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. न्यूझीलंडमध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यात ५० हून अधिक धावांची खेळी करणारा श्रेयस दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी २०१४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात महेंद्रसिंह धोनीने अशी कामगिरी केली होती.
- तीन सामन्याच्या द्विदेशीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रम श्रेयसने आपल्या नावावर केला. त्याने या मालिकेत १०३, ५२ आणि ६२ अशा एकूण २१७ धावा केल्या. भारताकडून द्विदेशीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावांचा विक्रम युवराज सिंगच्या नावे होता. त्याने २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध २१० धावा केल्या होत्या.
- एकाच मालिकेत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी दोन शतकी भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन शतकी भागीदारी केल्या होत्या. आताच्या न्यूझीलंड मालिकेत श्रेयस आणि लोकेश राहुल यांनी दोन शतकी भागीदारी केल्या.
- कारकिर्दीत पहिल्या १६ एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत श्रेयसने ७४८ धावांसह पहिले स्थान पटकावले. त्याने नवज्योज सिंग सिद्धूचा ७२५ धावांचा रेकॉर्ड मोडित काढला.
हेही वाचा -
तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!
हेही वाचा -