वेलिंग्टन - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेसिन रिझर्ववर रंगलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावापाठोपाठ दुसऱ्या डावातही चांगला कामगिरी केली नाही. दुसऱ्या डावात भारताला फक्त १९१ धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचे आव्हान होते. ते आव्हान न्यूझीलंडने अगदी सहज गाठून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या दोन्ही डावाला खिंडार पाडणाऱ्या टिम साउथीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
The 10-wicket loss was 🇮🇳's first defeat in the ICC World Test Championship 🏆 #NZvIND pic.twitter.com/FletOSBASs
— ICC (@ICC) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The 10-wicket loss was 🇮🇳's first defeat in the ICC World Test Championship 🏆 #NZvIND pic.twitter.com/FletOSBASs
— ICC (@ICC) February 24, 2020The 10-wicket loss was 🇮🇳's first defeat in the ICC World Test Championship 🏆 #NZvIND pic.twitter.com/FletOSBASs
— ICC (@ICC) February 24, 2020
हेही वाचा - यशस्वी जयस्वाल 'हिट' तर, अर्जुन तेंडुलकर 'फ्लॉप'
सामन्यात सलग दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज फारशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावा केल्या. कालच्या डावावरून पुढे खेळताना अजिंक्य रहाणे २९ तर हनुमा विहारी १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळण्यात यजमान गोलंदाजांनी उशीर केला नाही. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने ६१ धावांत ५ तर ट्रेंट बोल्टने ३९ धावांत ४ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक -
- नाणेफेक - न्यूझीलंड (गोलंदाजी)
- भारत पहिला डाव - ६८.१ षटकात सर्वबाद १६५ (मयांक अग्रवाल ३४, अजिंक्य रहाणे ४६; टीम साऊथी ४९/४, काईल जेमिसन ३९/४)
- न्यूझीलंड पहिला डाव - १००.२ षटकात सर्वबाद ३४८ (केन विल्यम्सन ८९, रॉस टेलर ४४, काईल जेमिसन ४४, ट्रेंट बोल्ट ३८; इशांत शर्मा ६८/५)
- भारत दुसरा डाव - ८१ षटकात सर्वबाद १९१ (मयांक अग्रवाल ५८, अजिंक्य रहाणे २९ ; टिम साऊथी ६१/५, ट्रेंट बोल्ट ३९/४)
- न्यूझीलंड दुसरा डाव - १.४ षटकात ९ धावा (टॉम लॅथम ७*, टॉम ब्लंडेल २*)