गॅले - क्रिकेटच्या मैदानावर काहीही घडू शकते असे म्हणतात. सध्या चालू असलेल्या न्यूझीलंड - श्रीलंका कसोटी सामन्यादरम्यान मैदानात अशीच एक खळबळजनक गोष्ट पाहायला मिळाली. गुरुवारी गॅले येथे झालेल्या या कसोटीच्या दुसऱया दिवशी ट्रेंट बोल्टच्या बाबतीत एक विचित्र प्रकार घडला.
सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या वेळी ८२ व्या षटकात ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत होता. ट्रेंट बोल्टने फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनियाच्या चेंडूवर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो चेंडू त्याच्या स्वत:च्या हेल्मेटच्या आत अडकला.
-
Trent Boult is a ball magnet, it's confirmed. https://t.co/AIIs478xoT
— Manya (@CSKian716) August 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trent Boult is a ball magnet, it's confirmed. https://t.co/AIIs478xoT
— Manya (@CSKian716) August 15, 2019Trent Boult is a ball magnet, it's confirmed. https://t.co/AIIs478xoT
— Manya (@CSKian716) August 15, 2019
चेंडू हेल्मेटमध्ये अडकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये चेंडू काढण्यावरून चढाओढ लागली. कारण चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता हेल्मेटमध्ये अडकला होता. त्यामुळे चेंडू काढून ते बोल्टला बाद करण्याचा प्रयत्न करणार होते. अर्थात हे सारे खेळकर आणि मजा मस्तीच्या वातावरणात सुरू होते. हा प्रकार पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचे वातावरण तयार झाले आणि सर्व खेळाडू स्मित हास्य करत थांबले.
या कसोटीत फलंदाजीचा निर्णय घेत न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६७ धावांत आटोपला आणि श्रीलंकेने १८ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडची दुसऱ्या डावात १७८ धावांत ७ बाद अशी अवस्था झाली आहे.