कराची - पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पीसीबीने वारंवार संधी दिल्याचा आरोप करत, पाकचा एकही खेळाडू भारतीय संघात खेळण्याच्या लायकीचा नसल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी फलंदाज जेव्हा चांगली धावसंख्या करेल, तेव्हाच त्याला पैसे देण्यात यावे, असा सल्लाही पीसीबीला दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मियादाद यांनी सांगितलं की, 'इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारखे संघ कामगिरीच्या आधारावर संघाची निवड करतात. पण पाकिस्तान असा एकमेव देश आहे. जो खेळाडूंना जुन्या कामगिरीच्या आधारावर संघात स्थान देतो. पाकिस्तान संघात एक शतक केल्यास, तो फलंदाज पुढील १० सामने संघात स्थान पक्के करतो. हाच पाकिस्तान संघाचा मुख्य प्रश्न आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सद्य स्थितीत पाकिस्तान संघात एकही असा खेळाडू नाही, जो भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड सारख्या मोठ्या संघातील खेळाडूला बदली म्हणून खेळू शकेल. पाकिस्तान संघाकडे फक्त चांगले गोलंदाज आहेत. पण एकही चांगला फलंदाज नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संघातील खेळाडू ७०, ८०, १०० किंवा २०० धावा करतात. ही फलंदाजीला साजेशी कामगिरी आहे. पण पाकिस्तान संघात सातत्याने अशी कामगिरी करणारा एकही खेळाडू नाही, असेही मियादाद म्हणाले. यावर उपाय सांगताना त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानचे फलंदाज जेव्हा चांगला खेळ करतील तेव्हाच त्यांना पैसे दिले पाहिजे, असे पीसीबीला सूचवले आहे.
हेही वाचा - 'धोनी फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे'
हेही वाचा - संजय बांगर यांना बीसीबीकडून सल्लागारपदाची ऑफर; पण 'ही' ठरली अडचण