ETV Bharat / sports

आयसीसीची झाली बैठक; टी-२० विश्वकरंडकाबाबत घेतला 'हा' निर्णय, IPL ला मोठा धक्का - T20 World Cup update

पुढील महिन्यापर्यंत, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडकाच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा निर्णय आयसीसीच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

No decision on T20 World Cup, ICC decides to wait and watch
आयसीसीची झाली बैठक; टी-२० विश्वकरंडकाबाबत घेतला 'हा' निर्णय, IPL साठी मोठा धक्का
author img

By

Published : Jun 11, 2020, 9:27 AM IST

दुबई - कोरोना विषाणूने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी-२० विश्वकरंडक रद्द करायचा का? याबाबत आयसीसीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुढील महिन्यापर्यंत, कोरोनाची स्थिती पाहून विश्वकरंडकाच्या आयोजनाबाबतचा विचार केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

टी-२० विश्वकरंडक रद्द केला जाईल, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे आयसीसीच्या निर्णयावर बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे लक्ष होते. कारण, विश्वकरंडक रद्द झाल्यावरच बीसीसीआयला आयपीएल खेळवता येणार आहे. पण विश्वकरंडकाचा निर्णय आता पुढील महिन्यात होणार आहे. दुसरीकडे जर टी-२० विश्वकरंडक खेळवला गेला तर या वर्षी तरी आयपीएल होणार नाही, असे दिसते.

बीसीसीआय आयपीएल आयोजन कोणत्या महिन्यात करायचे यावर, विचार करत आहे. टी-२० विश्वकरंडक रद्द झाल्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत होती. याशिवाय कोरोनामुळे आयपीएल जर भारतामध्ये खेळवण्यात येणार नसेल तर त्यासाठी पर्यायही शोधले गेले होते. आयपीएल भरवण्यासाठी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांनी बीसीसीआयपुढे प्रस्तावही ठेवला आहे. पण यातील एक पर्याय असलेल्या विश्वकरंडक रद्द बाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेतला जाणार आहे.

बैठकीत काय झाली चर्चा -

आयसीसीच्या बैठकीत कोरोनाबाबत चर्चा करण्यात आली. सध्याच्या घडीला परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज घेण्यात आला. त्याचबरोबर भविष्यात ही स्पर्धा खेळवायची की नाही, याबाबत चर्चाही करण्यात आली. पण टी-२० विश्वकरंडक खेळवायचा की रद्द करायचा, याबाबत अजूनही आयसीसीने निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वकरंडक भरवण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. यामुळे विश्वकरंडक रद्द होणार, अशी चर्चा होती.

हेही वाचा - पाकिस्तान संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी युनिस खानची नियुक्ती

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीचे नवे नियम.. लाळेच्या वापरावर बंदी, कसोटीत असणार पर्यायी खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.