मुंबई - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बसवले, अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताचे खंडन अमित शाह यांनी केले आहे. त्यांनी या निवड प्रक्रियेत आपला कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अमित शाह एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीसीसीआयच्या अध्यक्ष निवडीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, 'माझा या निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही. सौरव गांगुलीशी माझी भेट झाली. ती वेगळ्या कारणाने झाली. मी बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटसोबत जोडला गेलेलो आहे. यामुळं मागे एकदा सौरवशी भेटलो असल्याचे त्यांनी सांगितलं.
या चर्चेदरम्यान, शाह यांनी सौरव गांगुलीला भाजपमध्ये प्रवेशाचे आमंत्रण दिले. २०२१ मध्ये गांगुली पश्चिम बंगालमध्ये भाजपचा चेहरा असणार का असे विचारले असता, अशी कोणतीही 'डील' झालेली नसल्याचे सांगत त्यांनी जर गांगुलीला भाजपामध्ये यायचे असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी दुपारी राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे नवे अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली. गांगुली २०२० पर्यंत बीसीसीआयचा कारभार पाहणार आहेत.
हेही वाचा - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील 'तो' गाजलेला नियम आयसीसीने बदलला
हेही वाचा - मोठी बातमी!..आयसीसीकडून झिम्बाब्वे संघाचे निलंबन मागे, 'हा' संघही झाला सदस्य