ETV Bharat / sports

NZ vs PAK : पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत

author img

By

Published : Dec 29, 2020, 9:10 PM IST

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभवाच्या छायेत आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७३ धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाअखेर पाकिस्तानची अवस्था ३ बाद ७१ अशी झाली आहे.

New Zealand vs Pakistan, 1st Test, Day 4: PAK 71/3 Chasing 373 to Win vs NZ
NZ vs PAK : पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत

माउंट माउनगुई - न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७३ धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाअखेर पाकिस्तानची अवस्था ३ बाद ७१ अशी झाली आहे. फवाद आलम आणि अजहर अली नाबाद खेळत आहेत.

न्यूझीलंड संघाने आपला दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित केला. यात टॉम ब्लंडेल ६४ आणि टॉम लॅथमने ५३ धावांची खेळी साकारली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १११ धावांची भागीदारी रचली. दोघे बाद झाल्यानंतर केन विल्यमसन वैयक्तिक २१ धावांवर बाद झाला. यानंतर हेन्री निकोल्सने ११ आणि रॉस टेलरने नाबाद १२ धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडी मिळून न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी ३७३ धावांचे तगडे आव्हान ठेवले.

दुसर्‍या डावात फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. संघाचे सलामीवीर शान मसूद आणि आबिद अली खातेही न उघडता बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था शून्यावर दोन गडी बाद अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर हॅरिस सोहेल आणि अझहर अली यांनी ३७ धावांची भागीदारी केली. हॅरिस सोहेल याला ९ धावांवर साऊथीने माघारी धाडले. यानंतर अझरह अली आणि फवाद आलम यांनी आणखी नुकसान होऊ दिले नाही. दोघे अनुक्रमे २१ आणि ३४ धावांवर खेळत आहेत.

न्यूझीलंडकडून टीम साऊदीने २ गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्टने १ गडी टिपला. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद ४३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांवर आटोपला. दरम्यान, पाकिस्तान संघाला पाचव्या दिवशी विजयासाठी ३०२ धावांची गरज आहे. तर न्यूझीलंडला विजयासाठी आणखी ७ विकेट घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाला एकाच दिवशी तिहेरी झटका; जाणून घ्या काय आहे प्रकरण

हेही वाचा - 'वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.