मुंबई - भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर न्यूझीलंविरुद्धची एकदिवसीय मालिका वगळला तिन्ही फॉरमॅटमध्ये १२ मालिका जिंकल्या आहेत. २१ फेब्रुवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. दरम्यान ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची असून भारताचा २०२० या वर्षातील हा पहिलाच परदेशातील कसोटी सामना आहे. यात भारतीय संघ कसोटीत विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक संघाला सहा मालिका खेळाव्या लागणार आहेत. यात प्रत्येक संघ मायदेशात ३ तर विदेशात ३ मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांच्याच देशात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सुरूवात केली. यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांना मायदेशात धूळ चारली. आता भारतीय संघ २०२० या वर्षात न्यूझीलंडविरुद्ध २ तर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ असे एकूण ६ सामने खेळणार आहे.
कसोटी मालिकेसाठी १२० गुण देण्यात येतात. दोन सामन्याची कसोटी मालिका असेल तर प्रत्येक कसोटीला ६० गुण आहेत. तर पाच सामन्याच्या कसोटी मालिका असल्यास प्रत्येक सामन्याला २४ गुण देण्यात येणार आहेत.
दरम्यान रवी शास्त्री यांनी लॉड्सवर होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघाला आणखी १०० गुणांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी जर आम्ही ६ विदेशातील कसोटीपैकी २ मध्ये जरी विजय मिळवला तरी आम्ही सुस्थितीत असल्याचं म्हटलं आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | अनिर्णीत | रद्द | गुण |
भारत | ७ | ७ | ० | ० | ० | ३६० |
ऑस्ट्रेलिया | १० | ७ | २ | ० | १ | २९६ |
इंग्लंड | ९ | ५ | ३ | ० | १ | १४६ |
पाकिस्तान | ५ | २ | २ | ० | १ | १४० |
श्रीलंका | ४ | १ | २ | ० | १ | ८० |
न्यूजीलंड | ५ | १ | ४ | ० | ० | ६० |
दक्षिण आफ्रिका | ७ | १ | ६ | ० | ० | २४ |
वेस्ट इंडीज | २ | ० | २ | ० | ० | ०० |
बांगलादेश | ३ | ० | ३ | ० | ० | ०० |
हेही वाचा -
क्रिकेटमध्ये आक्रमकता, नाविन्य आणि कल्पकता 'या' खेळाडूंनी आणली, माजी दिग्गज खेळाडूचे मत
हेही वाचा -
कोणीही अन् कोठेही या.. टीम इंडिया तयार, विराटचा जगभरातील संघांसह न्यूझीलंडला इशारा