दुबई - वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंड संघाने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेअंतर्गत न्यूझीलंडने चार मालिकेत पाच सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने कसोटी मालिकेत विंडीजला २-० असे हरवत निर्भेळ यश संपादन केले.
![New Zealand reached number three in the World Test Championship points table](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9893139_tuntitled_1612newsroom_1608085914_134.jpg)
हेही वाचा - बॉर्डर-गावसकर चषक : दोन 'बलाढ्य' संघात रंगणार पहिला सामना
कोरोना विषाणूच्या साथीमुळे बर्याच मालिका आणि सामने पूर्ण होऊ शकले नाहीत. हे लक्षात घेता आयसीसीने नवीन गुणांची प्रणाली लागू केली होती. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर भारत दुसर्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल.
![New Zealand reached number three in the World Test Championship points table](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9893139_tcapture_1612newsroom_1608085914_359.jpg)
न्यूझीलंडने सोमवारी वेस्ट इंडिजला एक डाव आणि १२ धावांनी पराभूत केले. त्यांनी पहिला कसोटी सामना एक डाव आणि १३४ धावांनी जिंकला. न्यूझीलंडला आता पाकिस्तानबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.