ऑकलंड - भारत आणि न्यूझीलंड दरम्यान शनिवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने मालिकाही गमावली. या सामन्यात न्यूझीलंडला संथगतीने गोलंदाजी केल्याने फटका बसला असून न्यूझीलंडच्या खेळाडूंचे या सामन्यातील ६० टक्के मानधन कपात करण्यात येणार आहे.
हेही वाचा - चक्क कर्णधार विराट म्हणतो.. आम्हाला जिंकायचंच नव्हतं, वन-डे आमच्यासाठी महत्वाचं नाही
आयसीसीने षटकाची गती कायम न राखल्याप्रकरणी न्यूझीलंडला शिक्षा ठोठावली आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी यासंदर्भात घोषणा केली. न्यूझीलंड संघाने या सामन्यात निर्धारित वेळेच्यानंतर ३ षटके टाकली. आयसीसीच्या नियमातील कलम २.२२ नुसार निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नाहीत, तर गोलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडू आणि त्यांचे सहायक यांच्यावर एका षटकासाठी २० टक्के याप्रमाणे मानधन कपात केली जाते.
हेही वाचा - IND vs NZ : फिल्डिंग कोचला उतरावे लागले मैदानात; कारण..
संथगती गोलंदाजीचा यापूर्वी भारतालाही फटका बसला आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून निर्धारित वेळेच्यानंतर ४ षटके टाकली गेली होती. त्यामुळे मानधनातील ८० टक्के रक्कम कापली होती. तर टी-२० मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यातही भारतीय संघाला दंडाची शिक्षा झाली होती. भारतीय संघाच्या खेळाडूंच्या मानधनातील अनुक्रमे २० आणि ४० टक्के रक्कम कापण्यात आली होती.