ETV Bharat / sports

हेच ते दोघे, ज्यांच्यामुळे आम्ही हरलो..! न्यूझीलंडने शेअर केला रोहित-शमीचा फोटो - भारताचा न्यूझीलंड दौरा २०२०

सुपर पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांचा एक एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये न्यूझीलंडने म्हटले आहे की, 'सेदान पार्कमधील आजची रात्र या दोघांसाठी खास ठरली आहे. सुरुवातीला शमीने भारताला पराभूत होण्यापासून वाचविले आणि नंतर रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.'

new zealand cricket board shared mohammed shami and rohit sharma photo
हीच ती दोघे, ज्यांच्यामुळे आम्ही हरलो..! न्यूझीलंडने शेअर केला रोहित-शमी जोडीचा फोटो
author img

By

Published : Jan 30, 2020, 1:00 PM IST

हॅमिल्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी झालेला टी-२० सामना अटीतटीचा ठरला. भारताने या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. मुख्य सामन्यात भारतीय संघ पराभूत होतोय की काय असे वाटत असताना, मोहम्मद शमीने केन विल्यम्सन आणि रॉस टेलरला बाद करत सामना सुपर ओव्हरमध्ये आणला. भारताला सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या दोन चेंडूवर १० धावांची गरज होती, तेव्हा रोहित शर्माने सलग दोन उत्तुंग षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, न्यूझीलंडला हा पराभव जिव्हारी लागला असून न्यूझीलंडच्या पराभवाचे सुत्रधार मोहम्मद शमी आणि रोहित शर्माचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

सुपर पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांचा एक एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये न्यूझीलंडने म्हटले आहे की, 'सेदान पार्कमधील आजची रात्र या दोघांसाठी खास ठरली आहे. सुरुवातीला शमीने भारताला पराभूत होण्यापासून वाचविले आणि नंतर रोहित शर्माने सुपर ओव्हरमध्ये सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.'

दरम्यान, सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माने खेचलेल्या षटकाराचीच चर्चा जास्त रंगली होती. तेव्हा न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन मोहम्मद शमी आणि रोहित शर्माचा एक फोटो शेअर करत भारतीय विजयाचे श्रेय दोघांना दिले आहे. सद्या हे ट्विट व्हायरल होत असून अनेकांनी या फोटोला लाईकही ठोकले आहे.

हेही वाचा - खरे जंटलमन..! दुखापतग्रस्त खेळाडूला किवी खेळाडूंनी उचलून मैदानाबाहेर नेलं, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - सुपर ओव्हर न्यूझीलंडसाठी अशुभ, केनची कबुली... वाचा एका क्लिकवर संपूर्ण रेकॉर्ड

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.