ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत? - महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती

एका क्रीडा संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार, धोनीने आपला परिवार आणि जवळच्या मित्रांना आपल्या निवृत्तीविषयी सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र आयपीएलचे पुढील दोन हंगाम तरी धोनी खेळणार आहे.

"MS Dhoni won't play for India again" - Former India captain set for international retirement in 2020?
महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याच्या तयारीत?
author img

By

Published : Mar 29, 2020, 10:18 AM IST

मुंबई - इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक महेद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. तो आयपीएलद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. त्यासाठी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव सत्राला हजेरीही लावली होती. पण, आता आयपीएलवर कोरोनाचे सावट आहे. यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची तयारी केली असल्याचे समजते.

एका क्रीडा संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यानुसार, धोनीने आपला परिवार आणि जवळच्या मित्रांना आपल्या निवृत्तीविषयी सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र आयपीएलचे पुढील दोन हंगाम तरी धोनी खेळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धोनीची अद्याप बीसीसीआयशी अधिकृत बोलणी केलेली नाही. पण आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्याने आपले मन मोकळे केले आहे. योग्य वेळ येताच तो आपली निवृत्ती जाहीर करेल.

दरम्यान, यंदाच्या हंगामातील आयपीएलबद्दल अंतिम निर्णय येईपर्यंत तो निवृत्तीचा निर्णय घेईल, याची शक्यता कमी आहे.

इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. धोनीने या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत संथ खेळी केली होती. यामुळे तो टीकेचा धनी ठरला. विश्वकरंडकानंतर निवड समितीने पहिल्यांदा मोठे पाऊल उचलत धोनीला विश्रांती दिली आणि संघात ऋषभ पंतला संधी दिली. पण पंतही आपली छाप सोडू शकला नाही.

दरम्यान, भारताचे माजी लिटल मास्टर सुनिल गावस्कर, भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग, त्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी, धोनी टीम इंडियात दिसण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने, आगामी टी-२० विश्वकरंडकासाठी धोनीची संघात निवड योग्य नाही, असे सांगितलं आहे.

हेही वाचा - Video : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा कोरोनावर हल्लाबोल, गायलं भन्नाट रॅप सॉन्ग

हेही वाचा - इरफान पठाण म्हणतोय, पुलिसवालोंका पगार बढाओ... व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.