मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वकरंडकात शेवटचा खेळताना दिसून येईल. तो विश्वकंरडकानंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. ३७ वर्षीय धोनी त्याच्या निवृत्तीनंतर काय करणार हे एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.
धोनीचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धोनी म्हणत आहे की, मी सर्वांशी एक गुपित शेअर करणार आहे. लहानपणापासून एक कलाकार बनण्याची इच्छा होती. मी खूपच क्रिकेट खेळलो. आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नव्या क्षेत्रात मला लक्ष घालायचे आहे. यासाठी काही पेंटिग्स मी तयार केली आहे.
धोनीला त्याचे पुढचे करिअर पेटिंग्मध्ये करायचे आहे. त्याने काही पेटिंग्सही त्याच्या चाहत्यांशी शेअर केले आहे. धोनीची या पेंटिंग्स तसे पाहयला गेले तर चांगल्या नाहीत पण या व्हिडिओतून धोनी निवृत्ती घेईल असे वाटत नाही.
धोनीने यापूर्वीच २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटला निवृत्ती ठोकली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १० हजार पेक्षा जास्त धावा काढणारा धोनी सध्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे.