मुंबई - मागील काही काळासाठी क्रिकेटपासून दूर असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक फलंदाज गल्ली क्रिकेट खेळत आहे. धोनीने हा व्हिडिओ शेअर करताना शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीने घेतला कारकिर्दीविषयी 'हा' मोठा निर्णय
धोनीने आपल्य़ा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये फलंदाज बाद होऊनही बाद देत नाही. हा फलंदाज ट्रायल चेंडू असल्याचे सांगत आहे. 'तुम्ही हा प्रकार क्रिकेटमध्ये बघितलाच असेल. जेव्हा तुम्हाला माहित असते की काय होणार आहे आणि तुम्ही कॅमेरा ऑन करता तेव्हा पुढच्या काही सेकंदात तुम्हाला तेच पाहायला मिळते. खासकर शाळेतल्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कधी ना कधी असे क्रिकेट खेळले पाहिजे', असे धोनीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
१२ वर्षांपूर्वी धोनीने पाकला मात देऊन भारतासाठी पहिला टी-२० विश्वचषक मिळवून दिला होता. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेत धोनी खेळला नव्हता. आगामी विजय हजारे करंडकासाठी धोनी खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आयसीसी विश्वकरंडक २०१९ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. या स्पर्धेनंतर त्याने वेस्ट इंडीज आणि मायदेशात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. दरम्यान, सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन धोनी सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, धोनीने आपला ब्रेक अजून अडीच महिने वाढवल्याचे समजते आहे.