ETV Bharat / sports

धोनी साक्षीला म्हणाला.. तु हे सगळं इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस - महेंद्रसिंह धोनी पत्नी साक्षी

धोनी सद्या क्रिकेटपासून लांब असून तो कुटूंबासह 'क्वॉलिटी टाइम' घालवत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत धोनी म्हणतो की, 'तु हे सगळं इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस.'

ms dhoni sakshi video troll on social media
धोनी-साक्षीमध्ये तु-तु मै मै, वाचा काय आहे प्रकरण
author img

By

Published : Feb 1, 2020, 10:02 PM IST

हैदराबाद - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि तिची पत्नी साक्षी यांचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हॉटेलमध्ये साक्षी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती. तेव्हा धोनी साक्षीला तू इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे करत असल्याचे म्हणताना दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ धोनीच्या एका चाहत्याने शेअर केला आहे.

धोनी सद्या क्रिकेटपासून लांब असून तो कुटूंबासह 'क्वॉलिटी टाइम' घालवत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत धोनी म्हणतो की, 'तु हे सगळं इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी करत आहेस.'

यावर साक्षी म्हणते की, मी हे सगळं यासाठी करते की, 'तुझे फॉलोअर्स जसे तुला प्रेम करतात, तसे मलाही करावे. तसेही मला सोशल मीडियावर धोनी कुठे आहे हाच प्रश्न विचारला जातो.'

दरम्यान, या व्हिडिओत साक्षी धोनीला स्विटी-स्विटी म्हणून लाडियाळपणे चिडवताना दिसते. धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्व करंडक स्पर्धेनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Intro:Body:

marathi sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.