मुंबई - भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीला पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता बीसीसीआयने धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर एकच अट पूर्ण करावी लागेल, असे सांगितलं आहे.
बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करायला हवी. आयपीएलमध्ये त्याने चांगली केल्यास तो संघात पुनरागमन करेल अन्यथा त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होतील.
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी धोनीचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान असून तो आगामी टी-२० विश्वकरंडकात संघात पुनरागमन करु शकतो. यासाठी त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, असे सांगितलं आहे.
दरम्यान, धोनी इंग्लंड विश्वविश्वकरंडकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीच्या जागेवर ऋषभ पंतला संघात संधी मिळाली. पण तो बऱ्याच वेळा नापास झालेला पाहायला मिळाला आहे.
बीसीसीआयच्या अटीनुसार, धोनी सध्या आपली तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. तो आयपीएल २०२० मध्ये कशी कामगिरी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - आयसीसीच्या महिला टी-२० वर्ल्डकप संघात फक्त एक भारतीय!
हेही वाचा - कोरोना व्हायरसचा आयपीएलला दणका?, BCCIकडून मिळाली मोठी अपडेट