मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. २०१० ते २०१९ या दशकात सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे दिले आहे. धोनीशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
ज्येष्ठ पत्रकार मार्टिन स्मिथ यांनी 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'च्या दशकातील सर्वोत्तम संघाची निवड केली. त्यांनी या संघात भारताचे धोनी, रोहित आणि विराट या खेळाडूंचा समावेश केला आहे. तर आफ्रिकेचे दोन, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी एक खेळाडू निवडले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, मिशेल स्टार्क हा एकमेव ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू या यादीत आहे.
-
Only one Aussie makes our ODI Team of the Decade...https://t.co/nYpzA4pmBk
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Only one Aussie makes our ODI Team of the Decade...https://t.co/nYpzA4pmBk
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2019Only one Aussie makes our ODI Team of the Decade...https://t.co/nYpzA4pmBk
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2019
'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चा दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ -
- एमएस धोनी (कर्णधार) (भारत)
- रोहित शर्मा (भारत)
- हाशिम आमला (द. आफ्रिका)
- विराट कोहली (भारत)
- एबी डिव्हिलियर्स (द. आफ्रिका)
- साकिब अल हसन (बांगलादेश)
- जोस बटलर (इंग्लंड)
- राशिद खान (अफगाणिस्तान)
- मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
- ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
- लसिथ मलिंगा (श्रीलंका)
हेही वाचा - IPL २०२० : आयपीएल संघमालकांची उडाली झोप, 'हे' आहे कारण
हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, दीपक चहरची संघात वापसी कठीण