ETV Bharat / sports

VIDEO : पंचांना धोनीचा दरारा?..संतापानंतर निर्णय बदलला - umpire paul reiffel and msd news

धोनीच्या संतापानंतर पंच पॉल राफेल यांनी वाइड देण्यासाठी अर्धवट उघडलेले हात खाली केले. या निर्णयावर हैदराबादचा कर्णधार वॉर्नरनेदेखील नाराजी व्यक्त केली.

ms dhoni make pressure on umpire paul reiffel in match against srh
VIDEO : पंचांना धोनीचा दरारा?..संतापानंतर निर्णय बदलला
author img

By

Published : Oct 14, 2020, 11:24 AM IST

दुबई - आयपीएलमध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या अंतिम टप्प्यात पंच पॉल रायफलच्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला. चेंडू वाईडच्या बाहेरून गेला असतानाही पंच पॉल यांनी वाईडचा निर्णय दिला नाही.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैदराबाद संघाने १८व्या षटकात १९ धावा केल्या. त्यांना विजयासाठी दोन षटकांत २७ धावांची आवश्यकता होती. शार्दुल ठाकूरच्या १९व्या षटकातील पहिला चेंडू वाइड रेषेच्या बाहेर असल्याने राशिद खानने फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तो चेंडू वाइड देण्यात आला. त्यानंतर शार्दुलने पुन्हा तसाच चेंडू टाकला. राशिदने जागेवरूनच चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला पण चेंडू धोनीकडे गेला. वाइड देण्यासाठी पंच पॉल राफेल हे खूण करणार तोच शार्दुल ठाकूर आणि धोनी यांनी आरडाओरडा केला. त्या आवाजामुळे वाइड देण्यासाठी अर्धवट उघडलेले हात पंचांनी खाली केले आणि वाइड देण्याचा निर्णय रद्द केला.

  • 2019 - MS Dhoni walking out to argue with the umpires.
    2020 - MS Dhoni giving in a stare and the umpire drops his hands.

    Thala and umpires - you can write a book about it. https://t.co/tbgrVOFw5e

    — Siddarth Srinivas (@sidhuwrites) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • I don't know about the umpire but MS for sure bullied the whole league for over a decade.

    — Heisenberg☢ (@internetumpire) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा प्रकार चाहत्यांना आणि नेटिझन्सना अजिबात आवडला नाही. अनेकांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. धोनीने पंचांवर दबाव आणला, असे काहींनी सांगितले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.