ETV Bharat / sports

'कॅप्टन' धोनी 'कर्नल'च्या भूमिकेत..वेस्ट इंडिज दौऱ्यात माघार घेत सैन्यात जाऊन देशसेवा करणार - लेफ्टनंट कर्नल

तसेच एका बीसीसीआय अधिकाऱ्याने, धोनी वेस्ट इंडिज दौरा करणार नाही. त्याऐवजी तो पॅरा मिलिट्री तुकडीला वेळ देणार आहे. धोनीने रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीपूर्वी हा निर्णय घेतल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

'कॅप्टन' धोनी 'कर्नल'च्या भूमिकेत..वेस्ट इंडिज दौऱयात माघार घेत सैन्यात जाऊन देशसेवा करणार
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:12 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने आज शनिवारी महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट केले. धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार असून या दोन महिन्यात तो सैन्य दलातील पॅरा मिलिट्रीच्या तुकडीमध्ये सामिल होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 21 जुलैला भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. यापूर्वी धोनीचे जवळचे मित्र पूर्व रणजी खेळाडू मिहिर दिवाकर यांनी धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसून तो सैन्यासाठी वेळ देणार असल्याचे सांगितले.

तसेच एका बीसीसीआय अधिकाऱ्याने, धोनी वेस्ट इंडिज दौरा करणार नाही. त्याऐवजी तो पॅरा मिलिट्री तुकडीला वेळ देणार आहे. धोनीने रविवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीपूर्वी हा निर्णय घेतल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

लेफ्टनंट कर्नल आहे धोनी -
2011 मध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतर भारतीय प्रादेशिक सेनेने भारतीय संघाचा तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंह धोनीला 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद उपाधी दिली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनीला प्रादेशिक सेनेकडून लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले. धोनी कपिल देवनंतर हा सन्मान मिळवणारा दुसरा क्रिकेटपटू ठरला होता.

धोनीने अनेकवेळा माध्यमांसमोर बोलताना मला निवृत्तीनंतर सैन्यात जायचे असल्याचे सांगितले आहे. सैन्यात आव्हानात्मक पोस्टिंग मिळावी, अशी धोनीची इच्छा आहे. सैन्यात गेल्यावर सियाचीन सारख्या कठीण ठिकाणी पोस्टिंग मिळवून देशसेवा करायला आवडेल, असे यापूर्वी धोनीच्या जवळच्या मित्राने सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, धोनी ऑगस्ट महिन्यामध्ये १५ दिवसांची आर्मी ट्रेनिंग करेल.

विश्वकरंडक स्पर्धेमध्ये धोनी 8 सामन्यात 273 धावा केल्या असून स्पर्धेत केलेल्या संथ खेळींमुळे धोनी टीकेचा धनी बनला. दरम्यान, विश्वकरंडकानंतर धोनी आपली निवृत्ती जाहीर करेल असे सांगण्यात येत होते. मात्र अद्याप धोनीने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.