चेन्नई - दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसने भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे.
आयपीएल २०२१ च्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने ख्रिस मॉरिसला १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली. यात आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघाने अखेरीस बाजी मारली.
दरम्यान, ख्रिस मॉरिसने मागील आयपीएलच्या हंगामात आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावात मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीने खरेदी केले होते. मात्र, यंदा आरसीबीने मॉरिसला करारमुक्त केले होते.
हे आहेत आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली लागलेले महागडे खेळाडू
- ख्रिस मॉरिस - १६.२५ कोटी (राजस्थान रॉयल्स २०२१)
- युवराज सिंह - १६ कोटी (दिल्ली कॅपिटल्स २०१५)
- पॅट कमिन्स १५.५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)
- कायले जेमिन्सन - १५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१ )
- बेन स्टोक्स १४.५ कोटी (रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
- ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१)
- युवराज सिंह १४ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०१४)
हेही वाचा - Test rankings: अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विनची टॉप-५ मध्ये एन्ट्री