मोठी बातमी : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरूद्दीन - hyderabad cricket association new president
भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अझरुद्दीनने मागच्या आठवड्यात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. भारतासाठी अझरुद्दीनने ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६२१५ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३७८ धावा ठोकल्या आहेत.

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आता आपल्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. हैदराबादच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अझरुद्दीनची निवड झाली आहे. अझरुद्दीनला अध्यक्षपदाच्या निवडणूकीत १४७ विरुद्ध ७३ अशी मते पडली.

हेही वाचा - 'भारत सुरक्षित आहे' हे सांगण्यासाठी त्याने केला चक्क दीड हजार किमींचा प्रवास
भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अझरुद्दीनने मागच्या आठवड्यात आपला अर्ज दाखल केला होता. भारतासाठी अझरुद्दीनने ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६२१५ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३७८ धावा ठोकल्या आहेत.
सौरव गांगुलीला बंगाल क्रिकेटचे अध्यक्षपद -
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सीएबीच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली. गांगुली आता जुलै २०२० पर्यंत सीएबीच्या अध्यक्षपदी राहणार आहे. याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने गांगुलीला सीएबीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये दादाची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
mohammad azharuddin became president of hyderabad cricket association
mohammad azharuddin latest news, mohammad azharuddin president news, hyderabad cricket association latest news, hyderabad cricket association new president, hca new president
मोठी बातमी : अझरूद्दीनची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आता आपल्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. हैदराबादच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अझरुद्दीनची निवड झाली आहे. अझरुद्दीनला अध्यक्षपदाच्या निवडणूकीत १४७ विरुद्ध ७३ अशी मते पडली.
हेही वाचा -

Conclusion: