नवी दिल्ली - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने विश्वचषकादरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांच्यांशी चांगले वर्तन करावे, अशी विनंती क्रिकेट चाहत्यांना केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध व्यक्तिगत टिप्पणीही करु नये असे तो म्हणाला.
![मोईन अली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8167f2fd318cb560de83fb3b6fe6d9f4_2105newsroom_1558425246_153.jpg)
पुढे बोलताना अली म्हणाला की, मला अशा आहे की विश्वचषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंना टिकेचा सामना करावा लागणार नाहीय. मला असे वाटते की त्या दोघांनीही स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपण सर्व माणुस असून प्रत्येकाकडून चुका या होतच असतात. वास्तवात स्म्थि आणि वार्नर हे चांगले खेळाडू असून विश्वचषकात त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल असा मला विश्वास आहे.
![वार्नर आणि स्म्थि](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3338793_warner-and--smith.jpeg)
मागच्या वर्षी दक्षिण अफ्रीकेमध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणात अडकल्यानंतर स्म्थि आणि वार्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बारा महिन्यांसाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. एका वर्षाची बंदी संपल्यानंतर दोघांचीही विश्वचषकासाठीच्या ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे.