मुंबई - भारतीय संघाने जानेवारी महिन्यात न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्यातील टी-२० मालिका भारतीय संघाने ५-० ने जिंकली. यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताचा दारूण पराभव झाला. न्यूझीलंड संघाने एकदिवसीय मालिका ३-० ने तर कसोटी मालिकेत २-० निर्भेळ यश मिळवले. यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठली. दरम्यान, कसोटी मालिकेत भारताच्या पराभवाला, विराटसह रोहित शर्मा कारणीभूत असल्याचे न्यूझीलंड गोलंदाजाने म्हटलं आहे.
घडलं असे की, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकलेनघनला एका चाहत्याने ट्विटरवर प्रश्न विचारला की, कसोटी मालिकेत रोहित शर्मा असता तर फरक पडला असता का? यावर मॅकलेनघनने, हो रोहित असता तर नक्कीच मालिकेत फरक पडला असता, असे सांगितले.
दरम्यान, रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळू शकला नव्हता. पण तो टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात होता. आयपीएलमध्ये मॅकलेनघन मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
हेही वाचा - Video : कोरोनामुळे घरीच थांबलेल्या क्रिकेटपटूची, पत्नीने घेतली शाळा
हेही वाचा - Covid १९ : शोएब अख्तर म्हणाला, भारताकडून पाकिस्तानच्या लोकांनी 'हे' शिकले पाहिजे