ETV Bharat / sports

MI vs SRH : मुंबईची हैदराबादवर ३४ धावांनी मात, गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप - mumbai beat hyderabad

शारजाहच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली.

MI vs SRH Predicted Playing 11, IPL 2020 Live Updates
MI vs SRH : मुंबईची हैदराबादवर ३४ धावांनी मात, गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप
author img

By

Published : Oct 4, 2020, 2:55 PM IST

Updated : Oct 4, 2020, 7:51 PM IST

शारजाह - मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला विजयी लय कायम राखली आहे. शारजाहच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. मुंबईचे २०९ धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत थोडाफार प्रतिकार केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही.

मुंबईच्या २०९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीर जोडीने सावध सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या दोन षटकात बिनबाद १२ धावा केल्या. पाचव्या षटकात ट्रेंट बोल्टने बेअरस्टो (२५) ला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर मनीष पांडे बाद झाला. पांडेने १९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३० धावा केल्या. एका बाजूने विकेट जात असताना दुसरी बाजू पकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले.

केन विल्यमसन अवघ्या ३ धावा काढून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने प्रियम गर्ग (८) आणि वॉर्नर बाद झाले. वॉर्नरने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारासह ६० धावा केल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर हैदराबादच्या विजयाच्या आशा संपूष्टात आल्या. हैदराबादचा संघ ७ बाद १७४ धावा करु शकला. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर कृणाल पांड्याने १ गडी टिपला.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हैदराबादने संघात दोन बदल करत भुवनेश्वर कुमारच्या जागेवर संदीप शर्माला संधी दिली. रोहितने संदीपचे स्वागत खणखणीत षटकार मारून केले. पण त्यानंतर पुढच्या चेंडूवर संदीप शर्माने रोहितला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्याने रोहितला (६) यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो करवी झेलबाद करून माघारी पाठवले.

क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या ४८ असताना सूर्यकुमार यादव सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर चूकीचा फटका मारत बाद झाला. यादवने १८ चेंडूंत २७ धावा केल्या. मुंबईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ४८ धावांवर समाधान मानावे लागले. डी कॉक आणि इशान किशन यांनी ३४ चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. या दरम्यान, डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि मुंबईला शंभरी गाठून दिली. डी कॉकने कामचलाऊ केन विल्यमसनच्या दुसऱ्या षटकात १७ धावा झोडपल्या.

मोक्याच्या क्षणी डी कॉक बाद झाला. त्याचा अडथळा राशिद खानने दूर केला. उंच मारण्याच्या नादात उडलेला झेल राशिदनेच टिपला. डी कॉकने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. यानंतर संदीप शर्माने १५ व्या षटकात सेट फलंदाज इशान किशनला माघारी धाडलं. किशनचा सुरेख झेल मनीष पांडेने पकडला. किशनने २३ चेंडूत ३१ धावा केल्या. यानंतर हार्दिक पांड्या आणि केरॉन पोलार्ड यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघांनी २६ चेंडूत ४१ धावांची भागिदारी केली.

हार्दिकने १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह २८ धावा केल्या. तर पोलार्डने ३ षटकारांसह १३ चेंडूत नाबाद २५ धावा झोडपल्या. कृणाल पांड्याने ४ चेंडूत २ चौकार २ षटकारांसह नाबाद २० धावा केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. राशिद खान एक गडी टिपला.

Last Updated : Oct 4, 2020, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.