लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय क्रितेट संघाचा पहिला सामना बुधवारी ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.
![भारतीय संघ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3464271_team-india-serie12.jpg)
साउथॅम्पटनमध्ये येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला. या सरावानंतर नेहमीप्रमाणे भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषदेत विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघातील एकही मोठा खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्य आला नव्हता.
भारताकडून पत्रकार परिषदेत केवळ फलंदाजांच्या सरावासाठी इंग्लंडला आलेल्या दिपक चहर आणि आवेश खान यांना पाठवण्यात येणार होते. मात्र पत्रकारांनी, जे खेळाडू विश्वकरंडकात खेळणारच नाही, ते विश्वकरंडकाशी संबंधित माहिती कशी देणार, असा सवाल उपस्थित करत पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.